छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस असा छळ केला ।धर्मवीर गड।२१ फेब्रु ते २१ मार्च बलिदान मास

छत्रपती संभाजी राजांना अटक - छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलूजला असलेली छावणी पेडगावला आणली. त्यानंतर याच गडावरून त्यांची उंटावर बसून विदुषकी टोप्या घालून अचकट विचकट वाद्ये वाजवीत धिंड काढली गेली. त्यानंतर त्यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. राजांसह अटकेत असलेल्या कवी कलश यांना राजांनी काव्य करण्यास सुचवले त्यांनी या प्रसंगी काव्य रचले.

यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग |
लहू लसत सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ||
जो रवी छवी देखतही होत बदरंग |
त्यो तव तेज निहारके तखत त्येजो अवरंग ||

कवितेचा अर्थ: रावणाच्या सभेत ज्या प्रमाणे हनुमंताला बांधून आणले, त्या प्रमाणे संभाजी राजास औरंगजेबापुढे उपस्थित केले गेले. हनुमंताच्या अंगाला शेदूर शोभून दिसावा असे घनघोर युद्ध करून रक्ताने अंग माखले आहे. हे राजन तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे हे तेज पाहून औरंग्याने आपल्या सिहासनाचा त्याग करून गुडघे टेकून नतमस्तक झाला आहे.

त्यांना नाना प्रकारे खजिना व किल्ले ताब्यात देण्यास सांगितले त्यांनी त्यास नकार दिला, त्यानंतर मात्र राजांना स्वराज्य हवाली करण्यास सांगितले त्यालाही स्पष्ट शब्दात नकार दिला व ते स्वराज्य धर्मासाठी धर्मवीर झाले. राजांची करारी भेदक नजर बादशाहाला सहन होत नव्हती. त्याने त्यांचे डोळे काढण्याचे सुलतानी फर्मान सोडले. सर्व शिक्षा मात्र अगोदर कवी कलश यांच्यावर केल्या जात होत्या. नंतर त्या राजांना दिल्या जात होत्या. नंतर त्यांना पेडगावहून हलवून भीमा - इंद्रायणीच्या संगमावरील तुळापुर वढूला नेउन त्या दोघांचीही गुढीपाडव्याचा दिवस मुद्दाम पाहून त्याच्या आदल्या धर्मवीर दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली. परिसरातील लोकांनी वढू बु।। येथे त्या दोघांचाही अंत्यविधी केला. आजही तिथे धर्मवीर संभाजी राजांची समाधी धर्मासाठी केलेल्या बलिदानाची साक्ष देत उभी आहे. आणि आजही संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातील युवक मावळे आणि टीम धर्मवीर हे धर्मवीर संभाजी राजे यांच्या स्मरणार्थ आजही बलिदान मासाचे पालन फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत करतात.

या व्हिडिओमध्ये आम्ही त्यांच्या इतिहासातील रहस्ये उलगडली आहेत, आशा आहे की तुम्हा सर्वांना आमचा व्लॉग आवडला असेल..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *